विल्हाडी येथील कृषी सेवा केंद्रामध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:14+5:302021-01-13T05:19:14+5:30
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम जालना : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नूतन वसाहत विभागामधील प्रभाग ३०मध्ये शनिवारी विशेष स्वच्छता ...

विल्हाडी येथील कृषी सेवा केंद्रामध्ये चोरी
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम
जालना : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नूतन वसाहत विभागामधील प्रभाग ३०मध्ये शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता सभापती हरिष देवावले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युतनगर, ऑक्सफर्ड शाळा परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये नगरसेविका उषा पवार, माजी नगरसेवक अशोक पवार यांच्यासह ऑक्सफर्ड शाळेतील शिक्षक व नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात
मंठा : मागील काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. ढगाळ वातावरणामुळे या भागातील रब्बी हंगामातील पिकांवर विपरित पिरणाम होत आहे. पिकांवरील रोगराई दूर करण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत आहेत. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे कृषी विभागाने कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.