शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
5
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
6
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
7
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
8
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
9
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
10
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
11
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
12
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
13
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
14
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
16
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
17
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
18
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
19
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट

टेंभुर्णी-दे. राजा रोडवर दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:14 IST

टेंभुर्णी- देऊळगावराजा सडकेवर पापळ फाट्याजवळ झालेल्या एका मोटारसायकल अपघातात एक तरुण ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : टेंभुर्णी- देऊळगावराजा सडकेवर पापळ फाट्याजवळ झालेल्या एका मोटारसायकल अपघातात एक तरुण ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथील गजानन शेषराव वरगणे, रामेश्वर वरगणे व टेंभुर्णी येथील भगवान आश्रुबा कावळे हे तिघे मोटारसायकल क्र. एमएच २१ बीएल ९९०५ ने उशिरा रात्री टेंभुर्णीकडे येत होते.दरम्यान, त्यांची मोटारसायकल पापळ फाट्याजवळ वळणावर आल्यानंतर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात सावंगी येथील तरुण शेतकरी गजानन वरगणे ( ३८) जागीच ठार झाले, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना टेंभुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयातून जालना येथे हलविण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेचा अधिक तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे फौजदार ज्ञानेश्वर साखळे, बीट जमादार पंडित गवळी करीत आहे.मयत गजाननचे टेंभुर्णी येथे शवविच्छेदन झाल्यानंतर बुधवारी सकाळी सावंगी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात वृध्द वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.यापूर्वीही या वळण रस्त्यावर अपघात झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.हा अपघात मंगळवारी रात्री उशिरा झाल्याने व अपघातातील तिघे सडकेच्या कडेला खड्यात फेकले गेल्याने मयतासह दोघे जखमी रात्रभर तिथेच पडून होते. सकाळी मॉर्निग वॉकला गेलेल्यांना विव्हळण्याचा आवाज आल्याने त्यांनी लगेच टेंभुर्णी पोलिसांना कळविले. त्यानंतर टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोकॉ. त्र्यंबक सातपुते, क्षीरसागर, राजेंद्र सानप, बळीराम तळपे, प्रदीप धोंडगे यांनी घटनास्थळी लगेच धाव घेऊन मयतासह जखमींना तातडीने टेंभुर्णी रूग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक