महाडीबीटी योजनेला दहा दिवसांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:17+5:302021-01-03T04:31:17+5:30

अर्जदार शेतकऱ्याला त्याचा वैयक्तिक मोबाइल क्रमांक आपल्या आधार कार्डला जोडलेला असावाच, हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. महाडीबीटी या वेबसाइटवर ...

Ten days extension for MahaDBT scheme | महाडीबीटी योजनेला दहा दिवसांची मुदतवाढ

महाडीबीटी योजनेला दहा दिवसांची मुदतवाढ

अर्जदार शेतकऱ्याला त्याचा वैयक्तिक मोबाइल क्रमांक आपल्या आधार कार्डला जोडलेला असावाच, हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. महाडीबीटी या वेबसाइटवर शेतकरी योजना म्हणून पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा परिषद कृषी विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, राट्रीय कृषी विकास योजना, यासह कृषी विभागाच्या योजना, अवजार बँक अशा विविध महत्त्वाकांशी योजनांमध्ये शेतकऱ्यांना नोंद अर्ज करता येणार आहे. दरम्यान, यापूर्वी ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. त्यांना पुन्हा भरण्याची गरज नाही. मात्र, लाभाच्या घटकामध्ये शेतकऱ्यांना बदल करण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी ११ जानेवारीपर्यंत अर्ज भरावेत. या तारखेपर्यंतच अर्ज ग्रह्य धरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनांनाही अर्ज करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असून या योजनांचा लाभा घेऊन इच्छुणाऱ्या विशेष घटकातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त सीईओ प्रताप सवडे, कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केले.

Web Title: Ten days extension for MahaDBT scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.