टेंभुर्णी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:18+5:302021-01-19T04:32:18+5:30

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर अखेर भाजपने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. १७ सदस्यीय या ...

Tembhurni Gram Panchayat under the control of BJP | टेंभुर्णी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

टेंभुर्णी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर अखेर भाजपने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. १७ सदस्यीय या ग्रामपंचायतीत भाजपने १० जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज केली आहे. ६ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून आले आहेत, तर एका ठिकाणी अपक्ष सदस्याने बाजी मारली आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीची ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. अखेर या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य शालीकराम म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने एकहाती सत्ता काबीज करीत हा गड राखला आहे. या निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण शिंदे, फैसल चाऊस, मुक्तारखॉ पठाण, शिल्पा देशमुख, मनीषा पाचे, कमल मुळे, चंद्रभागा सोनसाळे, सुमन म्हस्के, सुशीला कुमकर, मनीषा अंधारे, तर राष्ट्रवादीचे रवी उखर्डे, लक्ष्मीबाई उखर्डे, विष्णू जमधडे, संध्या कांबळे, पांडुरंग बोरसे, उषा गणेश गाडेकर हे सदस्य विजयी झाले आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार राम गुरव यांनी बाजी मारली आहे.

Web Title: Tembhurni Gram Panchayat under the control of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.