शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांची किनगाव चारा छावणीला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 01:06 IST

लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच सकाळी तहसीलदार मनीषा मेने, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी प्रवीण शिनगारे व कर्मचा-यांनी भेट देऊन शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : तालुक्यातील किनगाव शिवारात अंबड बाजार समितीच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या चारा छावणीतील जनावरे व शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला लोकमतने मंगळवारच्या अंकात वाचा फोडली. लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच सकाळी तहसीलदार मनीषा मेने, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी प्रवीण शिनगारे व कर्मचा-यांनी भेट देऊन शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या.उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन चारा वाटपास सुरुवात केली.किनगाव शिवारात बाजार समितीच्या वतीने चारा छावणीस शुक्रवारी सुरुवात करण्यात आली, सध्या या छावणीमध्ये ७१८ जनावरे असल्याची नोंद आहे. शनिवारी काही शेतकºयांनी गोंधळ घालून तब्बल १७ टन हिरवा ऊस चारा पळवून नेला. यामुळे छावणीतील संपूर्ण चारा संपल्याचे कारण देत बाजार समितीने रविवार व सोमवार असे सलग दोन दिवस जनावरांना चारा दिला नाही. तसेच या ठिकाणच्या गलथान नियोजनामुळे रोहिलागड तसेच परिसरातील शेकडो मुक्या जनावरांना साध्या सावलीची व्यवस्था करण्यातही बाजार समिती प्रशासन अपयशी ठरले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर लोकमत प्रतिनिधीने चारा छावणीला भेट देऊन मंगळवारच्या लोकमतमध्ये या बद्दलचे वृत्त प्रसिध्द केले होते.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारdroughtदुष्काळRevenue Departmentमहसूल विभागLokmatलोकमत