जालना जिल्ह्यातही पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST2020-12-22T04:29:27+5:302020-12-22T04:29:27+5:30
औरंगाबादहून प्रथम या पथकाने बदनापूर तालुक्यातील वाकुळणी, रोषणगाव, हिरवा या गावांना भेटी दिल्या, तसेच जालना तालुक्यातील नंदापूर आणि जालना ...

जालना जिल्ह्यातही पथकाकडून पाहणी
औरंगाबादहून प्रथम या पथकाने बदनापूर तालुक्यातील वाकुळणी, रोषणगाव, हिरवा या गावांना भेटी दिल्या, तसेच जालना तालुक्यातील नंदापूर आणि जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला या पथकाने भेट दिली. या पथकासोबत कृषी संचालक आर.पी. सिंग आणि जलशक्ती विभागाचे सुप्रिटेंडंट इंजिनिअर एम.एस. सहारे यांच्यासह आ. कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, पंडित भुतेकर
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या सीईओ निमा अरोरा, उपायुक्त मणियार, कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, जिल्हा सहकार निबंधक नानासाहेब चव्हाण, कृषी उपायुक्त विजय माईनकर आदींची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांनी अति पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगून रोषणगाव येथे तर तीन तासांत २०० मि.मी. पाऊस पडल्याचे सांगितले. त्यामुळे शेतातील पिके वाहून जाऊन जमीन खरडून गेल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
चौकट
मदत कधी मिळणार..
केंद्र सरकारचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या गाड्यांचा ताफा अचानक आल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले, तसेच पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही पाहणी केली होती, तीच मदत आणखी मिळाली नाही, आता तुम्ही कधी अहवाल देणार आणि कधी नुकसानभरपाई मिळणार, असे प्रश्न पथकाला करण्यात आले; परंतु यावर पथकातील अधिकाऱ्यांनी कुठलीच प्रतिक्रया दिली नाही.