शिक्षक दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST2021-09-07T04:35:50+5:302021-09-07T04:35:50+5:30
खंडित वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. अचानक वीज ...

शिक्षक दिन उत्साहात साजरा
खंडित वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. अचानक वीज गुल होत असल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय लघुउद्योजकांचेही मोठे नुकसान होत आहे. ही बाब पाहता संबंधितांनी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
बस सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
जालना : जालना ते अन्वी ही बससेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत. ही बस तातडीने सुरू करावी, अशी मागणी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा राळा यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन विभागीय व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.
विस्कळीत सेवेचा ग्राहकांना फटका
जालना : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे एकमेकांना संपर्क साधणे अवघड होत असून, इंटरनेट सेवाही सुरळीत चालत नाही. इंटरनेट सुरळीत चालत नसल्याने मुलांच्या ऑनलाइन शिक्षणावर परिणाम होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात
बदनापूर : जालना-औरंगाबाद महामार्गावर बदनापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
मंठा : आगामी काळातील गणेशोत्सवासह इतर सण, उत्सव साजरे करताना कोरोनातील प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, कायद्याचे उल्लंघन कोणी करू नये, असे आवाहन मंठा पोलीस ठाण्याचे पोनि. संजय देशमुख यांनी केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
जालना : राज्य परिवहन महामंडळाच्या परतूर येथील बसस्थानक व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. अस्वच्छतेमुळे येेथे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. शिवाय कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.