वैद्यकीय बिलांसाठी शिक्षकांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:45+5:302021-01-08T05:42:45+5:30
शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आजारपणासाठी तसेच कुटुंबातील आई, पत्नी, वडील, मुलगा, मुलगी आदींच्या आरोग्यासाठी वैद्यकीय खर्च शासनाकडून मिळतो. यासाठी कर्मचारी ...

वैद्यकीय बिलांसाठी शिक्षकांची परवड
शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आजारपणासाठी तसेच कुटुंबातील आई, पत्नी, वडील, मुलगा, मुलगी आदींच्या आरोग्यासाठी वैद्यकीय खर्च शासनाकडून मिळतो. यासाठी कर्मचारी वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत सादर करतात. ही वैद्यकीय बिले मंजूर करून घेताना शिक्षकांची प्रचंड दमछाक होते. बिलांच्या मंजुरी प्रक्रियेतील दिरंगाईने अनेकजण या योजनेचा लाभ घेणेच टाळतात. अनेक शिक्षकांना त्यांच्या आजारपणासाठी शासनाने दिलेल्या योजनेमुळे रुग्णांना मदत मिळते. मात्र, मागील वर्षभरापासून अनेक शिक्षकांची बिले प्रलंबित आहेत. यामध्ये अनेक दुर्धर आजारी शिक्षकांचा समावेश आहे. हृदयरोग, अपघाती शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांची बिले निधीअभावी रखडल्याने शिक्षकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा स्तरावर निधी नसल्याच्या कारणास्तव शिक्षकांना पैसे मिळत नाहीत. यासाठी वैद्यकीय बिलांना तत्काळ मंजुरी देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. काही शिक्षकांनी वर्षापूर्वी कुटुंबातील सदस्यांसाठी केलेला वैद्यकीय खर्चही मिळालेला नाही. काहींच्या नातेवाईकांचे आजारपणात निधन झाले. मात्र, तरीही वैद्यकीय बिले मिळाली नसल्याची खंत शिक्षक बोलून दाखवित आहेत.