टँकर उलटला, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:48 IST2017-11-18T23:48:41+5:302017-11-18T23:48:44+5:30

सूरत येथून आंध्र प्रदेशकडे फिनाईल घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने चालकाचा ट्रकखाली दबून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले.

 Tanker reversed, one killed | टँकर उलटला, एक ठार

टँकर उलटला, एक ठार

शहागड : सूरत येथून आंध्र प्रदेशकडे फिनाईल घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने चालकाचा ट्रकखाली दबून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गहिनीनाथनगर (ता.अंबड) येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली.
हाजियापोर्ट, सूरत येथून आंध्र प्रदेशकडे फिनाईल घेऊन जात असलेला टँकर (जीजे.१८-एएक्स-४०८६) औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गहिनीनाथनगरजवळ (ता. अंबड) चालकाचे नियंत्रण सुटल्याने शनिवारी पहाटे चार वाजता उलटला. या अपघातात चालक म. रफीक नूरमहंमद (रा. पुरेठोनी, पो. पिठी, ता.लिलोही, उत्तर प्रदेश) हा जागीच ठार झाला. तर म. इब्रार नूर महंमद (रा.मदपूर ), अब्दुल जाकेर अब्दुल वाजेद हे दोघे गंभीर जखमी झाले. टँकरमधील रसायन रस्त्यावर पडल्याने सर्वत्र दुर्गंंधी पसरली होती. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काळी वेळ ठप्प झाली होती.

Web Title:  Tanker reversed, one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.