टँकरची संख्या रोडावली

By Admin | Updated: September 3, 2014 01:09 IST2014-09-03T00:56:00+5:302014-09-03T01:09:20+5:30

जालना : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त भागातील टँकरची संख्या रोडावली असून २६ आॅगस्ट रोजी ४६ असलेली संख्या २ सप्टेंबर रोजी १७ वर आली आहे.

The tanker number is screwed | टँकरची संख्या रोडावली

टँकरची संख्या रोडावली


जालना : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त भागातील टँकरची संख्या रोडावली असून २६ आॅगस्ट रोजी ४६ असलेली संख्या २ सप्टेंबर रोजी १७ वर आली आहे. तर विहिरींच्या अधिग्रहणाची संख्याही १६१ वरून केवळ १६ वर आली आहे. आगामी काळात टँकरची संख्या फारशी वाढणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने निराशाच केली होती. आॅगस्टच्या मध्यंतरानंतर जिल्ह्यात भोकरदन, परतूर, जालना, बदनापूर, घनसावंगी या तालुक्यांत काही भागात चांगला पाऊस झाला. मात्र पोळा सणापासून आठवडाभरात जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पाणी आले. विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
२६ आॅगस्ट रोजी ४६, २७ रोजी ४५, २८ रोजी ४४, २९ रोजी ३८ तर ३१ आॅगस्ट रोजी ३१ टँकर सुरू होते. मुदत संपल्याने १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात कुठेच टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला नाही. मात्र जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी तातडीने टंचाईग्रस्त भागातील टँकर सुरू ठेवण्याचे आदेश दिले. याबाबतची माहिती शासनाला कळविण्यात येणार असून मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, पावसामुळे जनतेला दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)
टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतरही काही भागात टंचाई कायम असल्याने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी २ सप्टेंबर रोजी ज्या ठिकाणी टंचाई आहे, तेथील टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश दिले.
४२६ आॅगस्ट रोजी १६६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले होते. २७ रोजी १६५, २८ रोजी १७०, २९ व ३० रोजी १६९, ३१ रोजी १६१ विहिरींचे अधिग्रहण होते. पावसामुळे ही संख्या १७ वर आली आहे.
अंबड तालुक्यात ८ गावे आणि १० वाड्यांमध्ये १३ तर बदनापूर तालुक्यात ३ गावांमध्ये ३ असे एकूण १६ टँकर जिल्ह्यात सुरू आहेत. तर अंबड तालुक्यात १५ व बदनापूर तालुक्यात २ अशा एकूण १७ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण कायम ठेवण्यात आले आहे. घनसावंगी तालुक्यात काही टँकर सुरू होण्याची शक्यत आहे. तर जालना तालुक्यातही एका टँकरची मागणी आहे.

Web Title: The tanker number is screwed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.