तालुका चिटणीसपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:51+5:302021-02-23T04:46:51+5:30
जालना : भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या जालना तालुका चिटणीसपदी माळी पिंपळगाव येथील शहादेव उमाजी कवडे यांची ...

तालुका चिटणीसपदी
जालना : भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या जालना तालुका चिटणीसपदी माळी पिंपळगाव येथील शहादेव उमाजी कवडे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीचे अरुण पिसोरे, दिलीप पाटेकर, दिलीप पिसोरे, सुनील थोरात आदींनी स्वागत केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप
जालना : घनसावंगी तालुक्यातील गुंज बुद्रूक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास बहुतांश नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून गौरव करण्यात आला.
बाजीउम्रद येथे शेतीशाळेचे आयोजन
जालना : शेतीबरोबर पुरक जोडधंद्याची सांगड महत्त्वाची असल्याचे शेतीशाळा समन्वयक नंदकिशोर पुंड यांनी सांगितले. जालना तालुक्यातील बाजी उम्रद येथे उपविभागीय कृषी अधिकारी एन. आर. कोकाटे, प्रकल्प सहाय्यक प्रभू शेजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हरभरा पिकाची शेतीशाळा घेण्यात आली.
दीपक गाडेकर यांची निवड
महाकाळा (अंकुशनगर): अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथील दीपक रामदास गाडेकर (वय २४) यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये असिस्टंट मॅनेजर (ग्रेडअ) पदी भारतातील ६९ विद्यार्थ्यांमध्ये पहिल्याच प्रयत्नात निवड झाली आहे त्याचा या निवडीचे अजय रसाळ, शिवदास गाडेकर यांच्यासह गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.
हबीब भंडारे यांना काव्यपुरस्कार जाहीर
भोकरदन: भोकरदन तालुक्यातील सिरसगाव (वाघ्रूळ) येथील कवी, गीतकार व लेखक हबीब भंडारे यांना सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव-नाशिक शाखेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय साने गुरुजी काव्यपुरस्कार’ मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं या काव्यसंग्रहास घोषित करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
बाजीउम्रद येथे शेतीशाळेचे आयोजन
जालना : शेतीबरोबर पुरक जोडधंद्याची सांगड महत्त्वाची असल्याचे शेतीशाळा समन्वयक नंदकिशोर पुंड यांनी सांगितले. जालना तालुक्यातील बाजी उम्रद येथे उपविभागीय कृषी अधिकारी एन. आर. कोकाटे, प्रकल्प सहाय्यक प्रभू शेजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हरभरा पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. व्यापारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर
जालना : परतूर तालुक्यातील वाटूर येथे व्यापारी महासंघाची बैठक जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब, सचिव जगनाथ थोटे, प्रवीण मेहता यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी वाटूर शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष कलीम शेख, सचिव अनिल वटाने यांचा समावेश करण्यात आला. यावेळी माजी सरपंच राधाकिशन माने, रुस्तुम पुंड, आदी उपस्थित होते. कोरोनाबाबत जनजागृती अभियान
जालना : गावात जनजागृती महाअभियान या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथे प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे मार्फत कार्यक्रम सादर करण्यात आला. शाहीर नानाभाऊ परिहार यांनी पोवाडा गाऊन व तोंडाला मास्क लावावा, सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करून जनजागृती केली. मागील काही दिवसांपासून काेराेना वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
प्रीत संस्थेतर्फे धार्मिक व सामाजिक उपक्रम
जालना: ख्रिस्ती समाजात महत्त्वाचे मानले जात असलेले पवित्र उपवास (लेंत समय) बुधवारपासून सुरू झाले आहे. २९ मार्चपर्यंत म्हणजे ४० दिवसांच्या या उपवासानिमित्त सच्ची प्रीत संस्था पुणे शाखा जालनाच्या वतीने गरजू, अनाथांना अन्नदान, फळे वाटप तसेच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सचिव प्रीती मोरे यांनी दिली. वसंत ऋतूच्या सुरुवातीस जगभरात ख्रिस्ती लोक उपवास करतात. यावेळी नागरिक उपस्थित होते.