टाकळी- भोकरदन गावात महिलांच्या हाती विकासाची दोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:28+5:302021-01-03T04:31:28+5:30
भोकरदन तालुक्यातील टाकळी- भोकरदन येथील ग्रामपंचायत ही सात सदस्य ग्रामपंचायत आहे; परंतु ग्रामपंचायतीची निवडणूक आली की, तालुक्याचे लक्ष या ...

टाकळी- भोकरदन गावात महिलांच्या हाती विकासाची दोरी
भोकरदन तालुक्यातील टाकळी- भोकरदन येथील ग्रामपंचायत ही सात सदस्य ग्रामपंचायत आहे; परंतु ग्रामपंचायतीची निवडणूक आली की, तालुक्याचे लक्ष या गावाकडे लागते. पूर्वी गावातील गटबाजीमुळे निवडणूक संवेदनशील बनायची. निवडणूक जवळ आली म्हणजे गावात तंटे हे ठरलेलेच असायचे; परंतु मागील पंचवार्षिकपासून टाकळीने कात टाकली आहे. ग्रामपंचायत बिनविरोध निवड करायची, असा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखी घेतला. विशेषत: यात तरुणांचा मोठा सहभाग होता. मागील पाच वर्षांत चांगले काम करीत आता ग्रामपंचायत बिनविरोध निवड करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेऊन तो सत्यातही उतरविला आहे. सदरील गाव हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आ. संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. सध्या गावात माजी सरपंच बळीराम बरकले यांच्या मार्गदर्शनाखाली सात सदस्य ते ही बिनविरोध निवडीसाठी तयार करण्यात आले आहेत. त्यात सुलोचना गावंडे, सुमन बरकले, सुशीला मगरे, मंगला गावंडे, दुर्गा बरकले, लक्ष्मीबाई गावंडे व सुनीता गावंडे यांचा समावेश आहे. या सोबतच तालुक्यातील वजीरखेड- देऊळगाव कमान ग्रुप ग्रामपंचायतदेखील बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या ग्रामपंचायतीत केवळ एका उमेदवाराचा अर्ज शिल्लक आहे. तसेच चांदई, बरंजळा या गावातही बिनविरोध निवडणुकी होण्यासाठी तडजोड सुरू आहे.