सामान्य माणसात आत्मविश्वास निर्माण करून स्वराज्य उभे केले-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:19 IST2021-02-22T04:19:52+5:302021-02-22T04:19:52+5:30
जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात सगळीकडे अराजकता माजलेली असताना सामान्य माणसांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून बहुजनांचे, ...

सामान्य माणसात आत्मविश्वास निर्माण करून स्वराज्य उभे केले-
जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात सगळीकडे अराजकता माजलेली असताना सामान्य माणसांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून बहुजनांचे, रयतेचे स्वराज्य उभे केले. त्यामुळे स्वराज्यातील प्रत्येक माणूस मरायला आणि मारायला तयार झाला होता, असे प्रतिपादन सिंधी पिंपळगाव येथे डॉ. विजय कुमठेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आमदार अरविंद चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. सदस्य कैलास चव्हाण हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे हभप पंडितराव महाराज, राम गायकवाड, पंडित लव्हटे, बबन सिरसाट, जनार्दन शिरसाट, विद्रोही कवी कैलास भाले यांची उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून गावचे सरपंच वैजनाथ सिरसाट, भास्कर चव्हाण, मधुकर चव्हाण, श्रीरंग चिंचपुरे, राजाभाऊ सिरसाट, सुरेश मुटकुळे, लक्ष्मण सिरसाट, ज्ञानेश्वर डिघे हे होते. यावेळी नुकतेच सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले सैनिक चंद्रकांत सिरसाट, साईनाथ क्षीरसागर, किशोर डिघे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माॅंसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षांचा सत्कार नवनाथ लोखंडे यांनी केला. याप्रसंगी राम गायकवाड, पंडित लव्हटे, कैलास भाले यांचीही भाषणे झाली. उद्घाटनपर भाषणात अरविंद चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले खरे प्रेरणास्थान आहेत. युवकांनी त्यांचे गुण घेतले पाहिजेत. महिलांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलांना तसेच घडवावे, असे आवाहन केले.
यावेळी देवीदास चव्हाण, गुलाब चव्हाण, रंगनाथ मोरझडे, नारायण सिरसाट, हिंमत चव्हाण, कल्याण चव्हाण, बाबासाहेब चव्हाण, अंकुश चव्हाण, गजानन चव्हाण, शंकर सिरसाट, प्रल्हाद सिरसाट, आशा लोखंडे, कडूबाई चव्हाण, गयाबाई चिंचपुरे, ठगूबाई चव्हाण, सरसाबाई सिरसाट, शोभाबाई चव्हाण, गंगूबाई सिरसाट, लताबाई सिरसाट, नंदा चव्हाण, सूर्यकलाबाई सिरसाट, कांताबाई सिरसाट, मायावती लोखंडे आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
210221\21jan_31_21022021_15.jpg
===Caption===
सिंधी पिंपळगाव येथे आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा सत्कार करताना मान्यवर दिसत आहे.