शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

प्रेम प्रकरणात हस्तक्षेप करणे बेतले स्वप्नीलच्या जीवावर; हत्याप्रकरणात दोघे जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:55 PM

नात्यातील मुलीस प्रेमप्रकरणाबाबत जाब विचारला होता

पारध (जालना )  : अखेर स्वप्नील भुते यांच्या मारेकऱ्यांना पारध पोलिसांनी बुधवारी (दि. १९ ) सकाळी  एकाला औरंगाबादवरुन तर दुसऱ्याला बुलढाणा येथून ताब्यात घेतले. कुमार अनूप सोनवणे आणि व एक अल्पवयीन असे आरोपींची नावे आहेत. प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन दोघांनी काटा काढल्याची माहिती पोलिसांना दिली.

मयत स्वप्नील भुते यांच्या नात्यातील मुलीसोबत कुमार सोनवणे याचे प्रेमप्रकरण होते. याची कुणकुण स्वप्नील भुते याला लागली होती. यामुळे काही दिवसापूर्वी त्याने आरोपी कुमार सोनवणे याला समजावून सांगितले. मात्र त्याने हो हो म्हणत कानाडोळा करत सदर मुलीचा पिच्छा सोडलाच नाही. यामुळे  स्वप्नील याने सदर मुलीला समजावून सांगत वारकरी संप्रदायातील आपले कुटुंबिय आहे. अशा प्रेम प्रकरणामुळे आपली समाजात बदनामी होईल, असे समाजावून सांगितले. मात्र, सदर मुलीने ही माहिती आपला प्रियकर कुमार सोनवणे याच्या कानावर घातली आणि आता माझ्या घरी आपल्या प्रेमाची माहिती कळले. त्यामुळे मला जीव दिल्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रियकर कुमार सोनवणे याने आपला मित्र सोबत घेऊन शुक्रवारी दुपारी मासरुळ (जि. बुलढाणा)  येथे दुचाकीने जाऊन मयत स्वप्नील भुते याला गाठले. ‘तुझ्या नात्यातील मुलीचा मी नाद सोडला’ असे खोटे सांगून चल फिरायला जाऊ असे म्हणत दुचाकीवरुन त्याला भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात आणले. 

( बुलढाण्याच्या वारकरी युवकाचा जालन्यात दगडाने ठेचून निर्घुण खून )

शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पारध पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी श्रीरंग सुरडकर यांच्या शेतात दोन्ही आरोपींनी मद्यपान केले. दारुची झिंग चढल्याने दोघांनी सदर मुलीच्या प्रेमप्रकरणावरुन स्वप्नीलशी वाद घालून त्याला काठीने बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्याला ठार केले.  या प्र्रकरणाचा पारध पोलिसांनी तीन दिवसात  बारकाईने तपास करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक