चौपदरीकरणाच्या कामाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:25 IST2017-12-09T00:25:04+5:302017-12-09T00:25:17+5:30
वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात संपादित केलेल्या जमीन व बांधकामाचा योग्य मोबदला न ...

चौपदरीकरणाच्या कामाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी
वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात संपादित केलेल्या जमीन व बांधकामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे पाहणी करण्यासाठी आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या.
यावेळी जोंधळे यांनी जालना जिल्हा हद्दीतील होत असलेल्या चौपदरीकरणाची पाहणी करून या महामार्गाचे काम करणा-या आयआरबी कंपनीच्या अधिका-यांना काम लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले. कुणाच्या संपादित झालेल्या शेत जमीन व बांधकाम बाबतच्या समस्या लवकर सोडवा अशा सूचनाही संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या. चुकीच्या निवाड्यामुळे या समस्या निर्माण झाल्याचे शेतक-यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले.
सा. बां. विभागाने संबंधित जमीन व इमारती संपादित करीत असताना प्रत्यक्ष जाऊन मोजमाप न केल्यामुळे चुकीच्या पद्धतीने मोजमाप झाल्याने शेतक-यांना मोबदला खूपच कमी मिळत असल्याची तक्रार आहे. जोंधळे यांनी या समस्या समजावून घेऊन एक महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल, असे सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, महामार्ग प्रकल्प अधिकारी गाढेकर, तहसीलदार दत्ता भारस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने, आयआरबीचे अधिकारी धनराज परीट, एस. के. सावळकर, जनसंपर्क अधिकारी पाठक, २११ महामार्ग अन्याय कृती समितीचे तुकाराम वायाळ, बळीराम खटके, अजीम शेख, पंडित गावडे, विठ्ठल कोकणे, राजेंद्र तांदळे, आरेफ खान आदी उपस्थित होते.