परतूर, मंठा तालुक्यांत विकासाचा अनुशेष कायम-सुरेश जेथलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:03 AM2019-09-06T01:03:56+5:302019-09-06T01:04:23+5:30

परतूर आणि मंठा तालुक्यात कॅबिनेट मंत्री असतानाही पाहिजे, तसा विकास झालेले नाही. आजही पाणी, रस्ते, आरोग्य यांचा अनुशेष कायम आहे, त्यामुळे जनतेने आता युती सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी केले.

Suresh Jethlia, the backbone of development in Patur, Mantha talukas | परतूर, मंठा तालुक्यांत विकासाचा अनुशेष कायम-सुरेश जेथलिया

परतूर, मंठा तालुक्यांत विकासाचा अनुशेष कायम-सुरेश जेथलिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : परतूर आणि मंठा तालुक्यात कॅबिनेट मंत्री असतानाही पाहिजे, तसा विकास झालेले नाही. आजही पाणी, रस्ते, आरोग्य यांचा अनुशेष कायम आहे, त्यामुळे जनतेने आता युती सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी केले.
गुरुवारी मंठा तालुक्यातील विविध गाव, वाड्यांना त्यांनी भेटी दिल्या. येथील जनतेशी संवाद साधला. यावेळी अनेक कर्जमाफी, पीकविमा, या योजनांपाूसन आम्ही वंचित असल्याचे सांगितले.
यावेळी काही मोजक्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. तो सर्वांना मिळून द्यावा, यासाठी आता काँग्रेसने पुढाकार घेण्याची गरजही वतर्विण्यात आली. जेथलिया यांनी तळणी येथून या संवाद यात्रेस प्रारंभ केला. या दौºया
दरम्यान, त्यांनी कानडी, कोकरंबा, शिरपूर, देवठाणा, वाघळा, लिंबखेडा, सासखेडा, दुधा या गावांना भेटी दिल्या.
यावेळी किसन मोरे, आण्णासाहेब खंदारे, विष्णू बोराडे, अवचार, दिलीप चव्हाण, विनायक बाहेकर, रमेश जगताप, शिवाजी चव्हाण, लक्ष्मण शिंदे, विठ्ठल बागल, अमोल राठोड, विनोद डोहीफोडे, वसंत थोरवे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Suresh Jethlia, the backbone of development in Patur, Mantha talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.