कार्यकर्त्यांनी जाहीर केली खोतकरांची लोकसभेची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:47 IST2018-08-13T00:47:09+5:302018-08-13T00:47:56+5:30
अद्याप लोकसभा निवडणुकींना ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असतानाच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या नावाने शुभेच्छा फलक - पोस्टर लावताना भावी खासदार असा उल्लेख केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

कार्यकर्त्यांनी जाहीर केली खोतकरांची लोकसभेची उमेदवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अद्याप लोकसभा निवडणुकींना ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असतानाच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या नावाने शुभेच्छा फलक - पोस्टर लावताना भावी खासदार असा उल्लेख केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना जुना जालना भागातील टाऊन हॉल येथे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या भल्यामोठ्या छायाचित्रासह स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा फलक लावला आहे. त्या फलकावर अर्जुन खोतकरांच्या छायाचित्रा खाली भावी खासदार असा उल्लेख केला आहे. त्यामुळे या मार्गावरून येणारे-जाणारे काही क्षण थांबून हे पोस्टर पाहताना दिसून आले. कार्यकर्त्यांना आता ‘भाऊं’ना लोकसभेत पाहायचे आहे. त्यामुळे त्यांची टक्कर विद्यमान खा. तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमवेत व्हावी असा शुध्द हेतू ठेवून हे पोस्टर लावण्यात आले असावे