सुनीता बडे यांचे अभियांत्रिकीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST2021-01-15T04:25:18+5:302021-01-15T04:25:18+5:30

काटकर यांची जिल्हा सचिवपदी निवड जालना : ऋषी विद्या मंदिर येथील क्रीडा प्रशिक्षक अमोल काटकर यांची चिनलोन असोसिएशनच्या जालना ...

Sunita Bade's engineering success | सुनीता बडे यांचे अभियांत्रिकीत यश

सुनीता बडे यांचे अभियांत्रिकीत यश

काटकर यांची जिल्हा सचिवपदी निवड

जालना : ऋषी विद्या मंदिर येथील क्रीडा प्रशिक्षक अमोल काटकर यांची चिनलोन असोसिएशनच्या जालना जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. राज्य सचिव रवी बकवाड यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. अमोल काटकर यांच्या या निवडीचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत केले जात आहे.

कृषी परिषदेच्या वतीने बोरखेडीत वृक्षारोपण

जालना : मराठा सेवा संघ प्रणित कृषी परिषदेच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त तालुक्यातील बोरखेडी, कडवंची, पीरकल्याण आदी भागांत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद, सुदाम जगदाळे, रामेश्वर नरवडे, गणेश नरवडे, अशोक शिरसाट, पंडित चव्हाण, कैलास राठोड, प्रवीण पवार आदींची उपस्थिती होती.

जिजाऊनगर नाव देण्याची मागणी

जालना : शहरातील अंबड चौफुली - राजपूतवाडी परिसराला जिजाऊनगर असे नाव द्यावे, अशी मागणी मुख्याधिकारी, नगर रचनाकार यांच्यासह भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी धर्मा खिल्लारे, सतीश पवार, दिलीप सोनवणे, दत्तात्रय म्हेत्रे, संजय खांडेभराड, सतीश पवार, दिलीप सोनवणे, दत्तात्रय मेहेत्रे, शंकर काळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Sunita Bade's engineering success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.