रविवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा : सहा उमेदवारांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:27+5:302021-04-08T04:30:27+5:30
मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय ३३६, मत्स्योदरी तंत्रनिकेतन ३८४, शासकीय तंत्रनिकेतन २४०, बारवाले महाविद्यालय २४०, अंकुशराव टोपे महाविद्यालय ३६०, नूतन हायस्कूल ...

रविवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा : सहा उमेदवारांचा समावेश
मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय ३३६, मत्स्योदरी तंत्रनिकेतन ३८४, शासकीय तंत्रनिकेतन २४०, बारवाले महाविद्यालय २४०, अंकुशराव टोपे महाविद्यालय ३६०, नूतन हायस्कूल संजयनगर १९२, उर्दू हायस्कूल २४०, सरस्वती भुवन ३६०, व्हीव्हीएस महाविद्यालय ४४०, सीटीएमके महाविद्यालय २८८, जि.प. कन्या प्रशाला १९२, एमएस जैन मराठी ४८०, सेंटमेंरी हायस्कूल २४०, दानकुंवर महिला महाविद्यालय १६८, जेईएस महाविद्यालय २८८, अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन ३१२, अंबड येथीलच पाचोड मार्गावरील तंत्रनिकेतन महाविद्यालय २८८, मत्स्योदरी विद्यालय, अंबड ३६०, मत्स्योदरी शिक्षण संस्था, अंबड २४०, ओमशांती महाविद्यालय, अंबड २४०, एमएस. जैन इंग्रजी हायस्कूल ३४३ एकूण सहा हजार ३३८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
चौकट
कोरोना नियमांची सर्व ती काळजी घेणार
कोरोनाकाळात होऊ घातलेल्या परीक्षेसाठी प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षार्थीस सॅनिटायझरची बाटली, हँडग्लोज देण्यात येणार आहेत. तसेच परीक्षा केंद्रात येताना थर्मल गनव्दारे त्यांचे तापमान पाहिले जाणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यासाठी स्वतंत्र खोलीसह पीपीई किट देण्याची व्यवस्था केली आहे.
केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना