शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळा संपत आलाय.. टंँकर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:00 IST

जालना तालुक्यातील खरपुडी या गावात अद्याप टँकर सुरु करण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

दीपक ढोले / विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गतवर्षी पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही जालना तालुक्यातील खरपुडी या गावात अद्याप टँकर सुरु करण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.जालना शहरापासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर खरपुडी हे गाव आहे. या गावात कृषी विज्ञान केंद्र आहेत. गावाची लोकसंख्या ५ हजार ८०० आहे. तर जनावरांची संख्या ९०० आहे. गतवर्षी पाऊस न पडल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडीठाक पडली आहे.या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. गावातील पाण्याची व्यवस्था बिकट आहे. उन्हाळा संपत आला आहे. परंतु, अद्यापही गावात टँकर सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील शेतकरी कापूस, बाजरी, तूर, ऊस, ज्वारी, हरभरा ही मुख्य पिके घेतात. काही प्रमाणात मोसंबी, डाळिंब या फळबागांचेही क्षेत्र आहे. पाण्याअभावी त्याचेही सरपण होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी टँकरचे पाणी विकत घेऊन फळबागा जगवित आहे. परंतु, पाणी कमी असल्याने अडचणीत भर पडली आहे.पाण्याची व्यवस्था नाहीच : जनावरांच्या चा-याचा प्रश्नगावात पशु-पक्ष्यांची संख्या जवळपास ९०० आहे. नागरिकांना प्रशासनाच्या वतीने टँकर सुरु करण्यात आले नाही तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न दूरच. त्यामुळे जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात चारा उपलब्ध नाही. बाहेरुन जास्तीचे पैसे खर्च करुन चारा विकत घ्यावा लागत आहे.पशुपालकांना जनावरांचे पालन पोषण करणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही पशुपालक आपली जनावरे मिळेल त्या भावात विकून मोकळे होत आहेत. गावाच्या परिसरात शेळ््या चारणा-या एका महिलेने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, मागील दोन महिन्यांपासून शेळ््या भर उन्हात चाराव्या लागत आहेत. त्यातच कुठे पाणी मिळते तर कुठे मिळत नाही.मोफत टँकरने पाणीपुरवठागावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने येथील अरुण गिरी हे मोफत टँकरने पाणी पुरवठा करीत आहे.टँकर आले की, ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी गर्दी करतात. शासकीय टँकर सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.चारा छावणीची गरजया गावात ९०० जनावरांची संख्या आहेत. यात गायी, म्हशी, शेळ््या, मेंढ्या इ. जनावरांचा समावेश आहे. सध्या गावात चारा उपलब्ध नाही. त्यातच माणसांनाच पाणी मिळत नसल्याने जनावरांना पाणी कुठून आणायचे, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात चारा छावणी सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई