एकाची मोती तलावात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:42 IST2017-11-26T23:42:33+5:302017-11-26T23:42:40+5:30
शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह रविवारी सकाळी मोतीतलावातील पाण्यात तरंगताना आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण बाबूराव डोळझाके (४७) असून ते शहरातील देहेडकरवाडी परिसरातील रहिवासी होते.

एकाची मोती तलावात आत्महत्या
जालना : शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह रविवारी सकाळी मोतीतलावातील पाण्यात तरंगताना आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण बाबूराव डोळझाके (४७) असून ते शहरातील देहेडकरवाडी परिसरातील रहिवासी होते.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोती तलाव चौपाटीवर भेळपुरीची गाडी लावणारे मनोज वाघमारे यांना तलावात असणा-या विहिरीलगत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. वाघमारे यांनी याबाबत चंदनझिरा पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस निरीक्षक योगेश गावडे, सहायक निरीक्षक परजने, एम.एन. घोडे व अन्य कर्मचा-यांनी अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, ही माहिती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक ग्रुपवर शेअर झाली. दुपारी काही जणांनी चंदनझिरा पोलिसांशी संपर्क साधून मृताची ओळख पटविली. डोळझाके यांना दारूचे व्यसन होते. अनेकदा ते घरातून निघून जायचे. गत काही दिवसांपासून त्यांना नैराश्य आले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सहायक उपनिरीक्षक एम.एन.घाडे तपास करीत आहेत.