ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:03+5:302021-02-10T04:31:03+5:30

जाफराबाद : तालुक्यातील कुंभारझरी शिवारातील ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना सोमवारी अचानक आग लागली. या आगीत सर्वच झोपड्या जळून खाक झाल्या ...

Sugarcane workers' huts set on fire | ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना आग

ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना आग

जाफराबाद : तालुक्यातील कुंभारझरी शिवारातील ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना सोमवारी अचानक आग लागली. या आगीत सर्वच झोपड्या जळून खाक झाल्या असून, या घटनेत संबंधित कामगारांचे जवळपास २ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

बारामती ॲग्रो कन्नड युनिट २ या साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर कुंभारझरी शिवारात झोपड्या करून राहत आहेत. हे कामगार सोमवारी ऊसतोडीसाठी गेले होते. या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना सोमवारी अचानक आग लागली. या आगीत १० पैकी ७ झोपड्यातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत जवळपास २ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आगीत नुकसान झालेल्यांमध्ये दीपक पाडुरंग मोरे, अमोल पंडित मोरे, किशोर भानुदास बनसोडे, बाबासाहेब संडू डोळसे, कैलास मुरलीधर बनसोडे, विलास उत्तम वाघमारे, संजय उत्तम खरात यांचा समावेश आहे. घटनेचा तलाठी लहू पवार यांनी पंचनामा केला. या मजुरांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सभापती राजेश चव्हाण, मधुकर गाढे, सरपंच संजय चव्हाण, गजानन चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार सतीश सोनी यांच्याकडे केली आहे.

.............................फोटो

Web Title: Sugarcane workers' huts set on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.