कारखान्यास साखर आयुक्तांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:57 IST2021-02-21T04:57:40+5:302021-02-21T04:57:40+5:30
महाकाळा (अंकुशनगर) - अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड ...

कारखान्यास साखर आयुक्तांची भेट
महाकाळा (अंकुशनगर) - अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शनिवारी भेट दिली. त्यांनी कारखान्याचे ऊस गाळप व कार्यक्षेत्रातील शिल्लक उसाचा आढावा घेऊन संपूर्ण ऊस गाळप करण्याच्या सूचना दिल्या.
यापूर्वीच अतिरिक्त उसाचे गाळप होण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी साखर आयुक्तांचे प्रतिनिधी पांडुरंग शेळके यांच्या उपस्थितीत नजीकच्या कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी प्रत्येक काऱखान्याला गाळपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर साखर आयुक्त गायकवाड यांनी शनिवारी सर्वच कारखान्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तम पवार यांच्याहस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला विशेष लेखापरीक्षक आर. एस. शेख, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बी. टी. पावसे, कार्यकारी संचालक दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
200221\20jan_67_20022021_15.jpg
===Caption===
अंकुशनगर येथे आयोजित बैठकीत बोलताना साखर आयुक्त गायकवाड व इतर