भरारी पथकाकडून अचानक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:02 AM2018-11-17T01:02:45+5:302018-11-17T01:03:14+5:30

जालना शहरातील पाच कापड विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची शुक्रवारी जीएसटीच्या राज्य विभागाकडून अचानक झाडाझडती घेण्यात आली.

Sudden investigation by the flying squad | भरारी पथकाकडून अचानक तपासणी

भरारी पथकाकडून अचानक तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरातील पाच कापड विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची शुक्रवारी जीएसटीच्या राज्य विभागाकडून अचानक झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईमुळे दिवसभर जालन्यात चर्चेला उधान आले होते. या संदर्भात सूत्रांनी सांगितले की, कापड व्यापाºयांकडून मालाची नोंद ठेवण्यासह खरेदी-विक्री करताना जीएसटीचा कर भरला जातो की, नाही याची छानबिन करण्यात आली.
जालना शहरातील नवीन जालना भागातील कडबी मंडी, नरीमान रोड, तसेच बाजार समितीचे नवीन व्यापारी संकूल येथील रेडमेड तसेच होलसेल कापडविक्रीचा व्यवसाय करणाºयांच्या दुकानावर पाच अधिकारी आणि १५ राज्य कर निरीक्षकांच्या पथकाने अचानक भेटी देऊन त्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे रजिस्टर तसेच संगणक प्रणालीतील नोंदी तपासल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही कारवाई दिवसभर सुरू होती. रात्री या दुकानांना सील लावण्यात आले असून, शनिवारी पुन्हा या दुकानांचे रेकॉर्ड तपासण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जालना शहरात गेल्या महिन्यात जीएसटी विभागाने ई-वेबिल संदर्भातही औद्योगिक वसहातीत तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी ९१ लाख रूपयांचा दंड वसूल केला होता. जीएसटी विभागाकडून आता कर वसूलीवर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Sudden investigation by the flying squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.