अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST2020-12-27T04:23:01+5:302020-12-27T04:23:01+5:30
परतूर : स्रेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने ३२ वर्षांपूर्वीच्या मित्र-मैत्रिणींचा परतूर येथे मेळावा भरला होता. उपस्थित अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
परतूर : स्रेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने ३२ वर्षांपूर्वीच्या मित्र-मैत्रिणींचा परतूर येथे मेळावा भरला होता. उपस्थित अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती, दोन दिसांची रंगतसंगत दोन दिसांची नाती’ या गीताची आठवण करून देणारा होता.
परतूर येथे १९८८ च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, ला.बा.शा. विद्यालय, जि.प. प्रशाला, योगानंद माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. निवृत्त प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रा. यशवंत दुबाले, झेड. के. खतीब, एम. वाय. कच्ची, अरुणकुमार बाहेती, मोहनराव सासवडे, शेख हसन, सुभाष खुरपे, विष्णुपंत खंडागळे, कमलबाई सरोदे, पी. के. आकात यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मनीषा मुळे व मंजू शीलवंत यांनी स्वागतगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी अनेकांनी शाळेतील आठवणी आणि आयुष्यातील घडामोडींचा अनुभव विशद केला. माजी विद्यार्थ्यांकडून होणारा सत्कार ही गौरवाची बाब असल्याचे उपस्थित माजी शिक्षकांनी सांगितले. यावेळी बाबासाहेब तेलगड, डॉ. सुधाकर जाधव, प्रा. रमेश शिंदे, बालासाहेब कुलकर्णी, लता आकात, हेमलता पाटील, अनिता पाटील, अर्चना पोरवाल, नारायण पडघन, विमल मुजमुले, जना काळे, प्रभा कुलकर्णी, मीना अग्रवाल, अनुराधा तापडिया, संध्या दीक्षित, मीरा राखे, उद्धव पवार, शिवाजी पोकळे, एकनाथ देवकर, बाबासाहेब साकळकर, भारती कायंदे, मंजिरी कुलकर्णी, गंगा आकात, संतोष जाधव यांच्यासह असंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट
माहेरच्या साडीने निरोप
परतूर शहरात शिकलेल्या व ३२ वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींना हे गाव आपले माहेरच वाटले. उपस्थित मैत्रिणींना सारिका तेलगड, द्वारका वायाळ, वैशाली कुलकर्णी यांनी साडी भेट दिली. या उपक्रमाने उपस्थित माजी विद्यार्थिनींसह माजी विद्यार्थीही भारावून गेले होते.
फोटो