जालन्यातील क्रिकेटची यशस्वी वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:27+5:302021-02-26T04:44:27+5:30
जालना : अष्टपैलू खेळाडू घडवत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवड समितीवर मागील १४ वर्षांपासून कार्यरत असलेले जालन्याचे भूमिपुत्र, प्रशिक्षक राजू ...

जालन्यातील क्रिकेटची यशस्वी वाटचाल
जालना : अष्टपैलू खेळाडू घडवत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवड समितीवर मागील १४ वर्षांपासून कार्यरत असलेले जालन्याचे भूमिपुत्र, प्रशिक्षक राजू काणे यांच्या निवडीने जालन्यातील क्रिकेट क्षेत्रात उत्साह संचारल्याचे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी केले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सोळा वर्षाखालील निवड समितीच्या सदस्यपदी फेर निवड झाल्याबद्दल प्रशिक्षक राजू काणे यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी संजय देठे, प्रशांत गाढे, रूपेश जैस्वाल, विष्णू सिनगारे, गणेश भोसले, शांतीलाल राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
काणे यांनी अनेक अष्टपैलू खेळाडू घडविले आहेत. विजय झोल या अष्टपैलू खेळाडूने विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व केले. तसेच २४ खेळाडू राज्याच्या संघात खेळले आहेत. शिवाय जालन्याच्या संघाने मुंबई-पुण्यासारख्या संघांना हरवून अंतिम सामना ही जिंकला. बीसीसीआयमध्ये विजेतेपद पटकावले. ही राजू काणे यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट क्षेत्राची सुरू असलेली वाटचाल अधिक बळकटी देणारी असल्याचे राऊत यांनी नमूद केले. सूत्रसंचालन संजय देठे यांनी तर शांतीलाल राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास विशाल नंदाल, दिलीप जाधव, श्रावण सराटे आदींची उपस्थिती होती.
फोटो