जिद्दीने यश प्राप्त करता येते- कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:28+5:302021-01-10T04:23:28+5:30
आष्टी : प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असल्यास यश संपादन करता येते, असे मत सेलू येथील संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त ...

जिद्दीने यश प्राप्त करता येते- कुलकर्णी
आष्टी : प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असल्यास यश संपादन करता येते, असे मत सेलू येथील संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले. परतूर तालुक्यातील लिखित पिंपरी येथील संत तुकाराम विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमात कुलकर्णी बोलत होते. साक्षी सोळंके हिची एमबीबीएससाठी शासकीय मेडिकल कॉलेज नंदूरबार येथे निवड झाली आहे, याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. यावेळी नागपूरचे प्राध्यापक नितीन जांभोरकर राम सोनवणे, रामकिसन सोळंके, विजयाताई सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची सवय ठेवली पाहिजे, आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या आणि आपले पुढील आयुष्य उज्ज्वल बनवा, असे सांगून जांभोरकर म्हणाले, आई- वडीलांचे स्वप्न व तुमची महत्वकांक्षा यांची सांगड घालता आली पाहिजे. पी.डी.सोळंके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जी.एस. सुरासे, मुख्याध्यापक संजय डोळसे, आर.के. पौळ, जे.बी. मस्के, पी.आर. पोटे, लक्ष्मण धोत्रे, नारायण बारहाते आदींची उपस्थिती होती.