ध्येय समोर ठेवले तर यश निश्चित मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:36+5:302021-02-05T08:05:36+5:30
जालना : सातत्य आणि जिद्दीने कष्ट केले तर यश नक्की मिळते. त्यामुळे युवकांनी आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अभ्यास ...

ध्येय समोर ठेवले तर यश निश्चित मिळते
जालना : सातत्य आणि जिद्दीने कष्ट केले तर यश नक्की मिळते. त्यामुळे युवकांनी आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अभ्यास करावा, असे आवाहन सत्यकुमार उपाध्याय यांनी केले.
येथील ब्राम्हण सभा, परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने यूपीएससीत यश संपादीत केल्याबद्दल सत्यकुमार उपाध्याय यांचा सत्कार करण्यात आला. माझ्या यशाचे श्रेय शिक्षक, आई-वडील, महाविद्यालयीन मित्रांना जाते, असे उपाध्याय म्हणाले. कठोर मेहनत करणाºयांच्या पदरी नक्की यश पडते, असेही ते म्हणाले. कार्यक्रमास अॅड. बळवंत नाईक, मुकुंद कुलकर्णी, गिरीष दशरथ, अरूण भालेराव, रसना देहेडकर, एस.जी. अग्निहोत्री, एस. एन. कुलकर्णी, कल्याण देशपांडे, डॉ. रूईखेडकर, संजय देशपांडे, दीपक रणनवरे, पवन जोशी, विश्वंभर कुलकर्णी, अरुण भालेराव, डॉ. गणेश अग्निहोत्री, योगेश पाठक, अपर्णा राजे, देशपांडे, शालिनी पुराणिक, श्रीकांत शेलगावकर, गिरीश दशरथ, वामन आगटे, ब्राह्मण सभेचे कोषाध्यक्ष अशोक देशमुख, सचिन देशपांडे, सिद्धू पिंपरकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक रमेश देहेडकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुभाष भाले यांनी केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो)