शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सवलत योजनेत ‘एसटी’ला सव्वा कोटीचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:01 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या माध्यमातून एसटीला मोठा आधार मिळाला असून, यातून जवळपास सव्वा कोटी पेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रवासी भारमान वाढविण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपाय करणाऱ्या एसटी. महामंडळाच्या उपक्रमांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. परंतु, शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या माध्यमातून एसटीला मोठा आधार मिळाला असून, यातून जवळपास सव्वा कोटी पेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.एसटी महामंडळ सध्या अत्यंत बिकट आर्थिक संकटाला तोंड देत आहे. खाजगी वाहतुकीचे मोठे आव्हान महामंडळासमोर निर्माण झाले आहे. अवैध वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून पोलीस प्रशासनाला नेहमीच पत्र व्यवहार केला जातो. परंतु, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध वाहतुकीचा सर्रासपणे उपयोग केला जात आहे, याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे.मध्यंतरी ‘हात दाखवा एसटी थांबवा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याला ब-यापैकी प्रतिसादही मिळाला. परंतु, या उपक्रमाला चालकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. एसटी महामंडळाने आपल्या कामकाजात सुधारणा आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. परंतु, असे असतानाही एसटी तोटा कमी होण्याचे नाव घेत नाही. मध्यंतरी शाळा, महाविद्यालयांच्या सहलींसाठी एसटी महामंडळाने विशेष सवलत जाहीर केली. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत.एकट्या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास चार ते पाच महिन्यांमध्ये सहलीच्या माध्यमातून एक कोटी ४० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.जिल्ह्यातील २२६ शाळांच्या सहलीविद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी, यासाठी शाळा, महाविद्यालयांमार्फत प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या जातात. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील २२६ शाळांमधील १४ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहलीत सहभाग नोंदविला होता. यामुळे जालना जिल्ह्यातील एसटी महामंडळाला याचा मोठा लाभ झाल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.

टॅग्स :state transportएसटीStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रtourismपर्यटन