विकासकामांचे प्रस्ताव सादर करा- जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:35 IST2018-07-01T01:34:51+5:302018-07-01T01:35:34+5:30
जिल्ह्याला यंदा विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला २०३ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. त्यासाठी विविध यंत्रणांनी त्यांच्या महत्वाच्या गरजा लक्षात घेऊन तातडीने प्रस्ताव तयार करून ते नियोजन समितीकडे सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शनिवारी दिले.

विकासकामांचे प्रस्ताव सादर करा- जिल्हाधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्याला यंदा विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला २०३ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. त्यासाठी विविध यंत्रणांनी त्यांच्या महत्वाच्या गरजा लक्षात घेऊन तातडीने प्रस्ताव तयार करून ते नियोजन समितीकडे सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शनिवारी दिले.
शनिवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची अधिकारी पातळवरील आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जगताप यांनी सांगितले की, गेल्यावर्षी जालना जिल्ह्याला नियोजन समितीतून विकास कामे करण्यासाठी १८४ कोटी रूपये मिळाले होते.
यंदा यात वाढ होऊन हा निधी २०३ कोटी रूपयांवर पोहचला आहे. यात ७० टक्के निधी मिळाला असून, उर्वरित ३० टक्के निधी कामे प्रगतीपथावर असताना मिळणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.
बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा तसेच, अप्पर जिल्हाधिकारी पी. बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, हे प्रस्ताव साधारपणे १५ दिवसात सादर करण्याच्या सूचनाही बिनवडे यांनी दिल्या.