अंबड येथे गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:30 AM2019-05-13T00:30:42+5:302019-05-13T00:31:14+5:30

पॉलिटेक्निक कॉलेज येथे शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

Student's suicide by taking a lump in Ambad | अंबड येथे गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

अंबड येथे गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : येथील पॉलिटेक्निक कॉलेज येथे शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. कपिल प्रतापराव शिंदे (२४, रा.परभणी ह.मु. शिवनगर अंबड ) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
याबाबत ठाणे अमलदार भारकड यांनी सांगितले की, परभणी येथील राहणारा मयत कपिल शिंदे हा शहरातील शिवनगर येथील अश्विनी विष्णू वाघ यांच्या घरात भाड्याने खोली घेऊन राहत होता. तो शहरातील पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये सिव्हील डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याने त्याच्या किरायाच्या राहत्या घरातील फॅनला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैय्या, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, अरक शेळके, जमादार बरडे, पोलीस नाईक देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
त्यानंतर कपिल शिंदे याचे प्रेत शवविच्छेदन करीता उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या प्रेतावर शवविच्छेदन केल्यानंतर त्याचे प्रेत पुढील अंतविधी कामी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कपिल प्रतापराव शिंदे याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही स्पष्ठ झाले नाही.
याप्रकरणी पृथ्वीराज जगदीश मोरे (२१, रा. इनकम टँक्स कॉलनी ता.जि.जालना ) याच्या माहितीवरुन अंबड पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक देशमुख हे करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
शनिवारी मित्रांनी केला वाढदिवस साजरा
दरम्यान, कपिलचा शनिवारी वाढदिवस होता. सायंकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कपिलने का आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक बलैय्या, पोउपनि. सुग्रीव चाटे यांनी भेट दिली.

Web Title: Student's suicide by taking a lump in Ambad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.