विंचवाच्या दंशाने विद्यार्थिनींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:01+5:302021-06-11T04:21:01+5:30
तीर्थपुरी : येथील नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीचा विंचवाने दंश केल्याने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. ...

विंचवाच्या दंशाने विद्यार्थिनींचा मृत्यू
तीर्थपुरी : येथील नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीचा विंचवाने दंश केल्याने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. वैष्णवी जनार्दन बारवकर (वय १४) असे मृत मुलीचे नाव आहे.
तीर्थपुरी येथील जनार्दन बारवकर यांची मुलगी वैष्णवी ही येथील मत्स्योदरी विद्यालयात वर्ग नववीत शिक्षण घेत होती. शाळा बंद असल्यामुळे ती आईसोबत बुधवारी शेतात गेली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास झाडाखाली ठेवलेले टोपले व ओढणी घेऊन ती घराकडे निघाली. तेवढ्यात विंचवाने तिच्या डोक्याला दंश केला. त्रास होत असल्याने तिला जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, आजोबा-आजी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.