संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST2021-01-08T05:40:19+5:302021-01-08T05:40:19+5:30

संच मान्यता २०२०-२१ साठी आधार क्रमांक असलेले विद्यार्थी ग्राह्य धरण्यात येणार असल्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. या ...

Student Aadhaar number needs to be updated for set recognition | संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत गरजेचे

संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत गरजेचे

संच मान्यता २०२०-२१ साठी आधार क्रमांक असलेले विद्यार्थी ग्राह्य धरण्यात येणार असल्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने जालना तालुकाअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांचा मंगळवार या दिवशीचा आधार ऑनलाइन नोंदणी प्रगती अहवाल प्रदर्शित करण्यात येत आहे. यात केंद्र अंतर्गत किती प्रगती झाली आहे, यातील फरक दर्शविण्यात आलेला आहे. अहवालाचे अवलोकन केले असता मागील अहवाल व सध्याचा अहवाल यात फारसा फरक आढळून येत नाही. गोलापांगरी, जालना, सावंगी तलान, पाचन वडगाव, सेवली या केंद्रांची प्रगती असमाधानकारक दिसून येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आधार ऑनलाइन नोंदणीसाठी विशेष बैठक आयोजित करून या भेटीचे नियोजन तालुका कार्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकण्यात यावे. या बैठकीस आपल्या बीटच्या विस्तार अधिकाऱ्यांना आमंत्रित करून केंद्राचा अहवाल सादर करावा. सदरील नोंदणी गुरुवारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी. विलंबाची सर्वस्वी जबाबदारी संबंधितावर असेल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Student Aadhaar number needs to be updated for set recognition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.