संघर्ष हा सावित्रीच्या जीवनाचा पाया -भालेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST2021-01-09T04:25:05+5:302021-01-09T04:25:05+5:30

जालना : संघर्ष हा सावित्रीच्या जीवनाचा पाया आहे. त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या; पण त्याचे भांडवल कधीच केले नाही. ...

Struggle is the foundation of Savitri's life - Bhalerao | संघर्ष हा सावित्रीच्या जीवनाचा पाया -भालेराव

संघर्ष हा सावित्रीच्या जीवनाचा पाया -भालेराव

जालना : संघर्ष हा सावित्रीच्या जीवनाचा पाया आहे. त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या; पण त्याचे भांडवल कधीच केले नाही. धर्माच्या रूढी- परंपरेनुसार स्त्री ही माणूस असूनही पुरुषप्रधान संस्कृतीची गुलाम होती. या प्रथेतून देशातील तमाम स्त्री जातीची मुक्ती सावित्रीबाई फुले यांनी केली, असे प्रतिपादन प्रा. शोभना भालेराव यांनी केले.

शहरातील अंकुशराव टोपे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भालेराव बोलत होत्या. यावेळी प्रा. शुभांगी राऊत, प्रा. सुमा आढाव, प्रा. शोभना भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत स्वाती गंदाखे हिने केले. दरम्यान, महाविद्यालयीन वर्गनिहाय प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात प्रा. सपना शहाणे यांनी कार्यक्रमाची भूमिका सांगितली. यानंतर प्रेरणा तांगडे, भावना सतकर, वैष्णवी पैंजणे, गीता कचरे यांनी मनोगतातून सावित्रीबाईंच्या त्यागाचा व कार्याचा आढावा घेतला. प्रा. शुभांगी राऊत यांनीही सावित्रीबाईंनी महिलांसाठी केलेले कार्य सांगितले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. रमेश भुतेकर, डॉ. शांताराम रायपुरे, डॉ. दादासाहेब गजहंस, डॉ. विजय कुमठेकर, डॉ. सुदर्शन तारख, डॉ. अशोक हुसे, डॉ. सुरेश गरुड, प्रा. दादासाहेब शिंदे, प्रा. पांडुरंग खोजे, प्रा. वशीम तांबोळी, प्रा. रामप्रसाद भालेकर, प्रा. बाळासाहेब उढाण, प्रा. प्रमोद भांदरगे, प्रा. शौकत शेख आदींची उपस्थिती होती.

Web Title: Struggle is the foundation of Savitri's life - Bhalerao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.