पट्यातील बातम्या पान १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:06+5:302021-01-03T04:31:06+5:30
जालना : दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून टायर व ट्यूब चोरून नेल्याची घटना अंबड तालुक्यातील पारनेर शिवारातील हरीश ट्रेडिंग दुकानात ...

पट्यातील बातम्या पान १
जालना : दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून टायर व ट्यूब चोरून नेल्याची घटना अंबड तालुक्यातील पारनेर शिवारातील हरीश ट्रेडिंग दुकानात गुरुवारी रात्री घडली. चोरट्यांनी रोख रकमेसह ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सचिन किशोर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि क्षीरसागर करीत आहेत.
रस्त्यावर उभी केलेली दुचाकी लंपास
जालना : जालना तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी पद्माकर आसाराम महागडे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पद्माकर महागडे यांनी जालना तहसील कार्यालयासमोर दुचाकी उभी केली होती. ते कामानिमित्त तहसील कार्यालयात गेले. काम संपल्यानंतर ते दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी आले असता, त्यांना दुचाकी दिसली नाही.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जखमी
महाकाळा (अंकुशनगर) : औरंगाबाद-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना एकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना अंबड तालुक्यातील महाकाळ फाट्यावर घडली. या अपघातात विष्णू विधाते (३५, रा. दगडवाडी, ता. बदनापूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
मोतीबाग येथून दुचाकी चोरी
जालना : शहरातील मोतीबाग परिसरात उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी शुक्रवारी रामचंद टेकचंद डेम्बडा (जालना) यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.