पट्ट्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST2021-01-08T05:40:37+5:302021-01-08T05:40:37+5:30

कुलगुरूंची वालसावंगी येथे फुलशेतीला भेट वालसावंगी : अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी वालसावंगी ...

Strip news | पट्ट्यातील बातम्या

पट्ट्यातील बातम्या

कुलगुरूंची वालसावंगी येथे फुलशेतीला भेट

वालसावंगी : अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी वालसावंगी (ता. भोकरदन) येथील संजय अस्वार यांच्या फुलशेतीला भेट देऊन पाहणी केली. मागील काही वर्षांपासून संजय अस्वार आधुनिक पद्धतीने फुलशेती करीत आहेत. यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. यावेळी कुलगुरू भाले यांनी अस्वार यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले.

नगरपंचायतच्या वतीने सायकल फेरी

घनसावंगी : नगरपंचायतच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल फेरीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांना आरोग्य विषयक जागृती व व्यायामाला प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी प्रकाश पितळे, ज्ञानेश्वर सोमवारे, राजू भारस्कर, नाईक आदींची उपस्थिती होती.

विजेत्या खेळाडूंचा जालना शहरात गौरव

जालना : शहरातील जेईएस महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या वतीने मध्यंतरी फिट इंडिया मोहिमेंतर्गत योग, साईकल रायडिंग, सोला गायन आदी स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सोमवारी महाविद्यालयाच्या वतीने पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. जवाहर काबरा, डॉ. एस. बी. बजाज, डॉ. हेमंत वर्मा, एन. व्ही. शेवाळे आदींची उपस्थिती होती.

अंभोरे यांची नियुक्ती

मंठा : बहुजन समाज पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी बबनराव अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे व उप जिल्हाध्यक्ष नितीन मोरे यांनी अंभोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. याबद्दल अंभोरे यांचे गाव परिसरातून स्वागत होत आहे. बबनराव अंभोरे यांचे आजवर असलेले समाज कार्य पाहून त्यांची बहुजन समाज पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अध्यक्षपदी राजपूत

भोकरदन : तालुका व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी महादूसेठ राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली. या बरोबरच महासंघाच्या उपाध्यक्षपदी विजय जैन तर सचिवपदी योगेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल गटनेते संतोष अन्नदाते, कैलास बाकलीवाल, जितेंद्र बाकलीवाल, विरेंद्र काला, गणेश पडोळ, दिलीप पांडे, विनय पालकर आदींनी राजपूत, जैन व शर्मा यांचे स्वागत केले आहे.

लांडग्याचा वावर वाढला

पिंपळगाव रेणुकाई : येथील परिसरात मागील काही दिवसांपासून लांडग्यांचा वावर वाढला आहे. यातच रविवारी रात्री काशीनाथ सास्ते यांच्या गोठ्यातील पाच शेळांच्या लांडग्याने फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवाय तीन शेळ्यांसह म्हैसही जखमी झाली आहे. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अवैध धंद्यात वाढ

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात मागील काही दिवसांपासून अवैध धंदे वाढले असून, याकडे वेळीच पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. विशेष म्हणजे बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत चालली आहे. वेळीच पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गौतम शेळके, शिवा खिस्ते, राजेभाऊ आघाव, सत्तार कुरेशी आदींनी केली आहे.

हंडोरे यांचा गौरव

जालना : माजी समाजकल्याण मंत्री चंद्रहांत हंडोरे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर तीन ते चार दिवसांपूर्वी आले होते. दरम्यान अंतरवाला येथील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी तालुका अध्यक्ष लहू उघडे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस प्रमोद रत्नपारखे, जिल्हा कार्याध्यक्ष सतीश वाहुळे, जितू उघडे, रमेश नरसाळे, दामोदर सुळसुळे, विलास रोकडे, गणेश निकम आदींची उपस्थिती होती.

चालक- वाहकांचे स्वागत

जामखेड : बदनापूर मार्गे पैठण बससेवा सुरू करण्यात आली असून, भायगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने बसचे पूजन करून चालक- वाहकांचा गौरव करण्यात आला. सदरील बस जालना बसस्थानकातून सकाळी सुटणार असून, बदनापूर येथील बस थांब्यावर सकाळी साडेआठ वाजता पोहचणार आहे. यानंतर रोषणगाव, नानेगाव, लोणार भायगाव, जामखेड व पाचोडमार्गे पैठणला साडेदहा वाजता पोहचणार आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Strip news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.