पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST2021-01-14T04:25:42+5:302021-01-14T04:25:42+5:30
जालना : साईश्रद्धा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे शिवनगर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या ...

पट्ट्यातील बातम्या
जालना : साईश्रद्धा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे शिवनगर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिला ढाकणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांची उपस्थिती होती. राम चांदोडे यांनी जिजाऊंच्या कार्याविषयी माहिती दिली.
धुळीने नागरिक त्रस्त
परतूर : शहरातील रस्त्यांची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर अवजड वाहन जाताच धूळ उडत असून, या धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष करून शिवाजीनगर ते टेलिफोन भवर रोड, नवीन कोर्ट ते साईनाथ मंदिर आदी रस्ते खराब झाले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप
अंबड : शहरातील मत्स्योदरी महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना मंगळवारी एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अंबड आगाराचे आगारप्रमुख सुरेश टकले, केशव कावळे, प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे आदींची उपस्थिती होती.
आरती मुके हिचा गौरव
परतूर : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहरातील उदयोन्मुख आरती मुके हिचा मंगळवारी गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्यावतीने घेण्यात आला. यावेळी प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, अशोक बरकुले, अभय जवळकर, संतोष शर्मा आदींची उपस्थिती होती.
हायवावर कारवाई
भोकरदन : तालुक्यातील बोरगाव खडक येथून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवावर महसूल विभागाने सोमवारी रात्री कारवाई केली. ही कारवाई नायब तहसीलदार के. टी. तांगडे, एस. टी. दळवी, एस. पी. कदम, एस. एस. लाड, गणेश वाघमारे यांनी केली.
स्वच्छता मोहीम
जालना : नगरपालिका स्वच्छता विभागाच्यावतीने शहरातील सदरी बाजार, रामनगर पोलीस कॉलनी या परिसरात स्वच्छता मोहीम नुकतीच राबविण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता विभाग प्रमुख राहुल मापारी, महेश भालेराव, संदीप वानखेडे यांनी प्रयत्न केले.
जिल्हा परिषद शाळेत बांबू मिशन कार्यशाळा
घनसावंगी : तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत बांबू मिशन कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य कृषी कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार पाशा पटेल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किसनराव खरात, नारायण खरात, राजेभाऊ खरात, अजित खरात, कैलास साळुंके आदींची उपस्थिती होती.
घायाळनगरात कार्यक्रम
जालना : घायाळनगर परिसरातील लोकमान्य विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण वानखेडे, उपाध्यक्ष शेषराव खरात, त्र्यंबकराव जाधव, द्वारकानाथ वाघमारे, सचिन मोटे, राजेश वानखेडे, विजय उंबरहंडे आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शन कार्यक्रम
जालना : शहरातील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात संस्थेचे सचिव ॲड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. बी. ई. गवळी, डॉ. स्मिता चव्हाण, सुवर्णा चव्हाण, आर. टी. झोटे, तुपे आदींची उपस्थिती होती.