पट्ट्यातील बातम्या १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST2021-01-20T04:30:44+5:302021-01-20T04:30:44+5:30
जालना : ऊसतोडीसाठी घेतलेले पैसे परत न करताच, कर्नाटक राज्यातील एका शेतातून पळून आलेल्या मजुराच्या भावासह त्याच्या चार ...

पट्ट्यातील बातम्या १
जालना : ऊसतोडीसाठी घेतलेले पैसे परत न करताच, कर्नाटक राज्यातील एका शेतातून पळून आलेल्या मजुराच्या भावासह त्याच्या चार नातेवाइकांचे अपहरण करून त्यांना शेतात डांबले. मात्र, आष्टी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन त्यांची सुटका केल्याची घटना रविवारी रात्री परतूर तालुक्यातील पाटोदा पाटीजवळ घडली. सहा जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल
जालना : घरात घुसून एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना जालना शहरातील गांधीनगर येथे घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिल आठवले याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ खरात हे करीत आहेत.
तिघांची महिलेस मारहाण
जालना : किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून एकास मारहाण केल्याची घटना जालना येथील बुऱ्हाणनगर येथे घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून नासीर बशीर परसुवाले, नुरा नासीर परसुवाले, बुदो बशीर परसुवाले (सर्व रा. बुऱ्हाणनगर) यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ. खरात करीत आहेत.
४२ फेरीवाल्यांना सव्वाचार लाखांचा आत्मनिर्भर निधी
जालना : पंतप्रधान आत्मनिर्भर अभियानांतर्गत फेरीवाल्यांना आपला व्यवसाय उभारणे, तसेच त्यात वृद्धी करण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी आता नगरपालिका, जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने ४२ फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजारांप्रमाणे चार लाख २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले, तसेच शाखा व्यवस्थापक विजय सोनकुसरे यांच्या हस्ते मी पण डिजिटल या यूपीआय पेमेंट सुविधेंतर्गत पथ विक्रेत्यांना यूपीआय कोडचे वितरण करण्यात आले.