जि.म.बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:37 IST2019-03-12T00:37:09+5:302019-03-12T00:37:23+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह ६४ शाखांचे १८१ कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला

जि.म.बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संप
जालना : न्याय व हक्काच्या मागण्यासाठी बँक व व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय न घेतल्याने को-आॅपरेटीव्ह बॅक्स एम्लाईज युनियनच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह ६४ शाखांचे १८१ कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. सन २०१० पासून स्थगित असलेला महागाई भत्ता प्रचलित दराने शंभर टक्के अदा करावा, याप्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला. याप्रसंगी शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयासमोर उपोषण केले.