पथदिवे दिवसाही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST2021-04-10T04:29:20+5:302021-04-10T04:29:20+5:30

कारवाईची मागणी परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. दारुमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, युवा ...

Streetlights continue throughout the day | पथदिवे दिवसाही सुरूच

पथदिवे दिवसाही सुरूच

कारवाईची मागणी

परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. दारुमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असून, दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

२५ जणांची शस्त्रक्रिया

अंबड : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या नवदृष्टी महाअभियानांतर्गत वडीगोद्री येथील २५ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. हे लाभार्थी नुकताच पुण्याकडे रवाना झाले.

लसीकरणासाठी रांगा

मंठा : येथील ग्रामीण रूग्णालयात गुरूवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी अधीक्षक डॉ. राजेंद्र गायके उपस्थित होते.

रस्ता दुरूस्तीची गरज

जालना : शहरांतर्गत भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत असून, संबंधितांनी रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Streetlights continue throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.