प्रेम, त्याग आणि सदाचाराची शिकवन भागवत कथेतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:09+5:302021-01-01T04:21:09+5:30
देळेगव्हाण : श्रीमद् भागवत कथा ही अद्भूत असून, ही कथा श्रीकृष्णाची शब्दमूर्ती आहे. ही पवित्र भागवत कथा श्रवण करण्याची ...

प्रेम, त्याग आणि सदाचाराची शिकवन भागवत कथेतून
देळेगव्हाण : श्रीमद् भागवत कथा ही अद्भूत असून, ही कथा श्रीकृष्णाची शब्दमूर्ती आहे. ही पवित्र भागवत कथा श्रवण करण्याची केवळ इच्छा होणे हे परमभाग्य आहे. ही कथा प्रेम त्याग आणि सदाचाराची शिकवण देते, त्यामुळे या कथेचे सातत्याने श्रवण करून आत्मचिंतन करतांनाच तशी कृती प्रत्येकाने आपल्या जीवनात करणे गरजेचे असून, भागवत ग्रंथ हे जीवन जगण्याचे मूलतंत्र असल्याचे मत भागवताचार्य हभप. विष्णू देशमुख यांनी केले.
देळेगव्हाण येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाची रूपरेषा बदलून अगदी छोट्या खाणी कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात भागवताचार्य हभप. विष्णू देशमुख कनक सागज आश्रम वैजापूरकर यांच्या वाणीतून रात्री ८ ते १० दरम्यान भागवत कथेचे आयोजन करण्यात येत आहे. भागवत कथेतून सदाचारी जीवनाची शिकवण मिळते. सदाचारी बनायचे असेल तर भगवंताच्या भक्ताची संगत करा, त्यातून जीवनात आमूलाग्र बदल होईल, जशी संगत तशी माणसाची घडण होत असते. त्यामुळे नेहमी संगत साधू संतांची करा, असा संदेश त्यांनी दिला.
चौकट
श्रीकृष्ण यांच्या भक्ताचे चरित्र वाचून ते आत्मसात करा, असे आवाहनही त्यांनी या वेळेस केले. संत हे राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे. केवळ माणसातील अंहकारामुळे आपण संतांना ओळखू शकत नाही. या भागवत कथेत संपूर्ण जीवनाचे सार आहे. म्हणून ही कथा श्रावण करून आत्मसात करा, असा संदेशही देशमुख महाराजांनी दिला.