वादळी आत्मचरित्र प्रेरणादायी - राजेश राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:44+5:302021-02-06T04:56:44+5:30
जालना : आयुष्यात आलेल्या वादळांचा संयमाने सामना करावा लागतो. अचाट बुद्धिमत्ता, प्रचंड ज्ञान व अंगभूत कौशल्याने परिस्थितीला अनुकूल ...

वादळी आत्मचरित्र प्रेरणादायी - राजेश राऊत
जालना : आयुष्यात आलेल्या वादळांचा संयमाने सामना करावा लागतो. अचाट बुद्धिमत्ता, प्रचंड ज्ञान व अंगभूत कौशल्याने परिस्थितीला अनुकूल करण्याचे कसब अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या शरद पवार यांच्या आत्मचरित्रात मरगळ आलेल्या जीवांना नवी प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन जालना जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश राऊत यांनी येथे बोलताना केले.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या चरित्रावर आधारित ‘पावसातला सह्याद्री : शरद पवार’ हा ग्रंथ गुरुवारी (ता. ४) नागसेन ग्रंथालयास रा. कॉ. ग्रंथालय विभागाचे प्रदेश सरचिटणीस नानाभाऊ उगले यांच्या हस्ते भेट देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजेंद्र ठोंबरे, गोरख खरात, राजू म्हस्के, बी. बी. गाडेकर, सुरेश खंडाळे, बाळासाहेब तनपुरे यांची उपस्थिती होती. नानाभाऊ उगले यांनी महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शरद पवार यांच्या वादळी व्यक्तिमत्त्वाचा परिचय नव्याने व्हावा, याच उद्देशाने ग्रंथालय विभागातर्फे महाराष्ट्रातील ग्रंथालयांना ग्रंथभेट देण्याचा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले.