शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

गुंडेवाडी शिवारात एकाचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:29 AM

गुंडेवाडी शिवारातील संतोष जिनिंग परिसरात एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील गुंडेवाडी शिवारातील संतोष जिनिंग परिसरात एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मृत व्यक्तची ओळख पटलेली नसून, या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुंडेवाडी शिवारातील संतोष जिनिंग लगत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी चंदनझिरा पोलिसांना दिली.माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश गावडे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मृत व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच मृतदेह कुजलेला असल्याने ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.पोलिसांनी आजूबाजूला चौकशी करून मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृत व्यक्तीस ओळखत नसल्याचे स्थानिकांंनी सांगितले.घटनास्थळ पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी कॉन्स्टेबल राम शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक व्ही. एस. पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस