शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांच्या घरीच चोरी; चंदनचोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:53 IST

यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांच्या निवास्थानाच्या परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी करून फरार झालेल्या चंदनतस्कराला भोकरदन पोलीसांनी अटक केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांच्या निवास्थानाच्या परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी करून फरार झालेल्या चंदनतस्कराला भोकरदन पोलीसांनी अटक केली आहे़यवतमाळचे पोलीस अधीक्षक एम़ राजकुमार यांच्या शासकीय निवास्थानातुन २ सप्टेंबरच्या मध्यरात्री चंदनतस्करांनी दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेली होती. त्यामुळे पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे या चोरट्यांचा तपास लावण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पूर्ण पोलीस अधिकाऱ्यांनी चक्रे फिरवली होती. सदर आरोपी हे सी़सी़टी़व्ही फुटेजमध्ये दिसून आल्यामुळे यवतमाळ पोलिसांनी या ठिकाणचे मोबाईल लोकेशनच्या आधारे दोन दिवसापासून भोकरदन तालुक्यातील कठोरा बजार येथे तळ ठोकला होता. मात्र, त्यांच्या हाती आरोपी लागले नाही. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, पोलीस कर्मचारी शेख आसेफ, गणेश पायघन, यांनी सापळा रचून या चंदन चोरीतील संशयित आरोपींना पकडून त्याला खाक्या दाखवताच त्याने आपण पोलीस अधीक्षकांच्या घराच्या परिसरातील दोन चंदनाच्या झाडाची चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. आपल्यासोबत अन्य साथीदार असल्याचेही त्याने सांगितले.पोलिसांचे पथक भोकरदन परिसरात तळ ठोकून बसलेले आहेत. या बाबत यवतमाळचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंनत कुलकर्णी यांनी सांगितले की, या चोरट्यांनी दोन महिन्यांपूर्वी येथील सर्वच वरिष्ठ अधिकाºयांच्या बंगल्याची रेकी केल्याचे फुटेज मिळाले असून त्या अधारे मिळालेल्या माहिती वरून आमचे कर्मचारी भोकरदन येथे ठाण मांडून आहेत एकाला पकडण्यात आले असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :ThiefचोरArrestअटक