मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST2021-09-08T04:36:07+5:302021-09-08T04:36:07+5:30
आष्टी : नांदेड जिल्ह्यातील गऊळ (ता. कंधार) येथे मातंग समाजातील नागरिकांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ...

मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन
आष्टी : नांदेड जिल्ह्यातील गऊळ (ता. कंधार) येथे मातंग समाजातील नागरिकांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मातंग समाज मंदिराच्या नियोजित जागेमध्ये बसवण्यात आला होता; परंतु गावातील काही राजकीय समाजकंटकांनी पोलीस यंत्रणेचा वापर करून पुतळा काढून घेतला. गऊळ गावातील मातंग समाजातील युवक, महिलांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.