रेल्वे संघर्ष समितीतर्फे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:47+5:302021-01-13T05:19:47+5:30

टेंभुर्णी : जालना- खामगाव लोहमार्ग हा पूर्वी सर्व्हे झाल्याप्रमाणे जाफराबाद तालुक्यातून नेण्यात यावा, अशी मागणी जाफराबाद रेल्वे संघर्ष समितीच्या ...

Statement to Union Ministers on behalf of Railway Struggle Committee | रेल्वे संघर्ष समितीतर्फे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

रेल्वे संघर्ष समितीतर्फे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

टेंभुर्णी : जालना- खामगाव लोहमार्ग हा पूर्वी सर्व्हे झाल्याप्रमाणे जाफराबाद तालुक्यातून नेण्यात यावा, अशी मागणी जाफराबाद रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी जालना येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ब्रिटिशांंच्या काळापासून प्रस्तावित असलेल्या जालना- खामगाव लोहमार्ग हा विदर्भाला जोडणाऱ्या जाफराबाद तालुक्यातून गेल्यास दळणवळणाच्या सुविधा निर्माण होतील. जाफराबाद तालुका हा देशाशी जोडला जाईल. देशभरातून सैलानी बाबा, जाईचा देव, राजुरेश्वराच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येणे सोईस्कर होईल, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय खंडेलवाल, सचिव सुनील मुळे, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, गोविंदराव पंडित, साहेबराव कानडजे, संतोष लोखंडे, दगडुबा गोरे, गजानन उदावंत, सुनील सावे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Statement to Union Ministers on behalf of Railway Struggle Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.