शिक्षणमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:10+5:302021-02-24T04:32:10+5:30
आठवडी बाजार बंद भोकरदन : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पिंपळगाव रेणुकाई येथे मंगळवारी होणारा बाजार बंद ठेवण्यात आला होता. ...

शिक्षणमंत्र्यांना निवेदन
आठवडी बाजार बंद
भोकरदन : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पिंपळगाव रेणुकाई येथे मंगळवारी होणारा बाजार बंद ठेवण्यात आला होता. ग्रामस्थांनी कोरोनाबाबत आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भुजंग यांचा सत्कार
जालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग यांनी राजूर येथे भेट देऊन बैठक घेतली. या बैठकीत गुन्हे शाखेच्या कामगिरीबद्दल भुजंग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब भुजंग, सपोनि संतोष घोडके आदी उपस्थित होते.
असजद खान याचे यश
जालना : शहरातील असजद खान यांनी आयसीएतर्फे घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून खान यांनी हे यश संपादित केले असून, त्यांचे कौतुक होत आहे.
रस्त्याची दुरावस्था
परतूर : शहरांतर्गत विविध भागांतील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.