रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:41+5:302021-09-07T04:36:41+5:30
जालना : शहरातील विविध भागातील रस्ते उखडले आहेत. त्यात विशेष करून लक्कडकोट परिसरातील रस्त्यांची अधिक दयनीय अवस्था झाली आहे. ...

रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जालना : शहरातील विविध भागातील रस्ते उखडले आहेत. त्यात विशेष करून लक्कडकोट परिसरातील रस्त्यांची अधिक दयनीय अवस्था झाली आहे. या भागातील गट्टू देखील उखडले आहेत. यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी लक्कडकोट परिसरातील रहिवाशी सुभाष चौधरी यांच्यासह गुरुदास नवमहालकर, संदीप नवमहालकर, सुरेश चौधरी आदींनी केली आहे. या संदर्भात सोमवारी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
जयश्री पवार यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जालना : येथील रहिवाशी जयश्री दिगंबरराव पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून समाजशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी जिल्ह्यातील शासकीय सेवेत कार्यरत परिचालकांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. डॉ. राहुल हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली.
दृष्टिहीन विद्यालयात पदाधिकाऱ्यांचा सत्कार
जालना : येथील गुरुगणेश दृष्टिहीन विद्यालयात शिक्षक दिन कार्यक्रमासह नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष संतोष ओस्तवाल, उपाध्यक्ष दीपेश भरवाडा, सचिव संकेत देसरडा, मनोजकुमार मुथा, दिनेश बरलोटा यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. धरमचंद गादिया, कचरूलाल कुंकुलोळ, संजय बंब, शांतीलाल संचेती, आनंद श्रीश्रीमाळ आदींची उपस्थिती होती.
लोकशाही दिनास आलेल्या नागरिकांचा रोष
जालना : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते; परंतु या उपक्रमांतर्गत विविध निवेदने आणि तक्रारी दिल्या जातात. असे असताना आज झालेल्या या लोकशाही दिन कार्यक्रमास त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना निवेदने देण्यास मज्जाव केला, तसेच हा उपक्रम गोपनीय असल्याचे सांगून नागरिकांना हुसकावून लावल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी रोष व्यक्त केला.