राज्य कर्मचारी संघटनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:11 IST2017-12-12T00:11:24+5:302017-12-12T00:11:48+5:30
जालना : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य राजपत्रित ...

राज्य कर्मचारी संघटनेची निदर्शने
जालना : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, महसूल कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या कर्मचा-यांनी या निदर्शनात सहभाग घेतला.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू कराव्यात, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, जुनी पेन्शन योजना लागू करणे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे इ. मागण्या जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी राजपत्रित अधिकारी महासंघाचे राजू नंदकर, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पी.बी.मते, याह्या पठाण, महसूल कर्मचारी संघटनेचे एन.डी.घोरपडे, विनोद भालेराव, व्ही.डी.म्हस्के, तलाठी संघाचे व्ही.एन.भोरे, बाळकृष्ण कळकुंबे, के.बी.म्हस्के, रामदास शिराळे आदींची उपस्थिती होती.