शेतकऱ्यांना अनुदान वाटपास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:38+5:302021-02-05T08:02:38+5:30
रस्त्यावर जनावरे भोकरदन : शहरातील मुख्य बाजारपेठेसह शहरांतर्गत भागातील रस्त्यांवर जनावरे ठाण मांडून बसत आहेत. रस्त्यावरील जनावरांमुळे चालकांना कसरत ...

शेतकऱ्यांना अनुदान वाटपास प्रारंभ
रस्त्यावर जनावरे
भोकरदन : शहरातील मुख्य बाजारपेठेसह शहरांतर्गत भागातील रस्त्यांवर जनावरे ठाण मांडून बसत आहेत. रस्त्यावरील जनावरांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. तरी प्रशासनाने लक्ष देऊन या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
कुंभार पिंपळगाव येथे बुद्ध पौर्णिमा साजरी
कुंभार पिंपळगाव : येथील आनंद बौद्ध विहारमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी भिकाजी गाढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पुनम कंटुले, ॲड.राजकुमार खरात, भीवराव शिंदे, रामभाऊ जाधव, रोहिदास शिंदे, लिंबाजी शिंदे, उत्तम शिंदे, जिजाबाई शिंदे व इतरांची उपस्थिती होती.
पालावर जाऊन बालकांना दिला डोस
घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पालावर जाऊन लहान बालकांना पोलिओचा डोस दिला. वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपाली चव्हाण, डॉ.संजीव ढवळे, आरोग्यसेविका उर्मिला वळसे, सपना पेदापल्ली, कीर्ती खोड, सुरेखा एखंडे, शुभांगी बोकण, योगेश काटकर, परमेश्वर गाढे, दत्ता गर्जे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी यासाठी प्रयत्न केले.
केंद्रप्रमुख हिरालाल श्रीबास यांचा सत्कार
अंबड : तालुक्यातील चिंचखेड केंद्राचे प्रमुख हिरालाल श्रीबास यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी विपुल भागवत, पंजाबराव साेळुंके, नंदकिशोर पैठणे, शिक्षण विस्ताराधिकारी नारायण कुमावत, केंद्रप्रमुख आर.आय. शेख, रणजीत बांगर, रमेश फटाले, मुख्याध्यापक व्ही.एल. जाधव, डी.के. काळे यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.